अक्षयकुमारचे ‘मिशन ऑगस्ट’ यशस्वी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

‘मिशन मंगल’च्या यशानंतर खिलाडी अक्षयकुमारचे बॉलीवूडमधील ‘मिशन ऑगस्ट’ यशस्वी झाले आहे. 2019 च्या ऑगस्ट महिन्यात स्कोर ट्रेंडस् इंडियाच्या चार्ट्सकर लोकप्रियतेमध्ये अक्षयकुमार अग्रेसर राहिला आहे. ‘मिशन मंगल’मुळे अक्षयला हे यश मिळाले आहे.

अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मीडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे. आकडेवारीनुसार, डिजिटल न्यूज (सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि केबसाइट), व्हायरल न्यूज आणि प्रिंटन्यूजवर ऑगस्टच्या चारही आठवडय़ांत 100 गुणांसह अक्षयकुमार पहिल्या क्रमांकावर आहे. स्कोर ट्रेंडस् इंडियाचे सह-संस्थापक अश्वनी कौल यांनी सांगितले, ‘14 हिंदुस्थानी भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्रोतातून डेटा गोळा करण्यात आला. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियाकरील क्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. यामुळे आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोअर आणि रँकिंगपर्यंत पोहोचू शकलो.’