भाजपच्या राजकीय टोळीकडून भूमाफियांना संरक्षण -अखिलेश यादव

भाजपची राजकीय टोळी पूर्णपणे गुन्हेगारांनी भरलेली आहे. जबरदस्तीने गरीबांची जमीन हडपणाऱया भूमाफियांचे ते रक्षण करतात. प्रत्येक विभागात कमालीचा भ्रष्टाचार असून जनतेच्या पैशाची लूट सुरू आहे. लूट, भ्रष्टाचार आणि अप्रामाणिकपणा हीच भाजप सरकारची ओळख बनली आहे, अशा शब्दांत समाजवादी पार्टीचे (सपा) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपवर हल्ला चढवला. सपा नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.