उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी बुलडोझर कारवाईवरुन भाजपवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, सूडाने भरलेल्या भाजपच्या राजकारणाचा हा विद्रूप चेहरा आहे. भाजप लोकांची हसती खेळती घरं उद्ध्वस्त करुन आनंदी होत आहे. ज्यांनी आपली घरे बांधली नाहीत, ते दुसऱ्यांची घरे पाडून कशाचा बदला घेतात, हेच कळत नसल्याची टीका अखिलेश यादव यांनी केली आहे. उद्ध्वस्त होणाऱ्या घरांबरोबरच भाजपही खाली घसरत आहे, भाजपने अनेक लोकांना बेघर केल्याची टीका अखिलेश यादव यांनी केली आहे.
अखिलेश यादव म्हणाले की, फारुखाबाद येथील अमृतपूरच्या उखरा गावात वर्षानुवर्षे वसलेल्या 25 कुटुंबांच्या घरावर बुलडोझर फिरवून भाजपने कित्येक वृद्धांना, आजारी, मुलं, आई, बहिण, मुलींना भर पावसात बेघर केले आहे. अखिलेश यादव यांनी काही दिवसांपूर्वी बुलडोझर कारवाईच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, कनिष्ठ न्यायालयाच्या सर्वोच्च आदेशाने बुलडोझरलाच नाही तर बुलडोझरचा दुरुपयोग करणाऱ्यांवरही कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. अखिलेश यादव यांनी भाजप सरकारवर निशाणा साधत सांगितले होते की, आता ना बुलडोझर चालवला जाईल, ना त्याला चालवणारा, दोघांच्या पार्किंगची वेळ आली आहे. बुलडोझर कारवाईवर तमाम विरोधी पक्षांनी निशाणा साधला होता आणि न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले होते.
ये है प्रतिशोध से भरी भाजपाई राजनीति का वीभत्स चेहरा। भाजपा बसे-बसाये घरों को गिराकर सुख पाती है। जिन्होंने अपने घर नहीं बसाये, पता नहीं वो दूसरों के घर गिराकर किस बात का बदला लेते हैं। हर गिरते घर के साथ भाजपा भी और भी नीचे गिर जाती है।
अमृतकाल के सूचनार्थ : आज लोकसभा… pic.twitter.com/pvA5YkZoLN
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) September 29, 2024
बुलडोझर कारवाई विरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेक दाखल केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी झाली होती. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितले होते की, गुन्हा कोणताही असो मात्र कोणाचे घर तोडण्याचा अधिकार नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी 1 ऑक्टोबरला होणार आहे.