काँग्रेस धोकेबाज, अखिलेश यादवचा हल्लाबोल

सामना ऑनलाईन । लखनौ

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी काँग्रेसवर निशाणा साधत काँग्रेस धोका देणारा पक्ष असल्याचे म्हटले आहे. लखनौ येथील प्रचार सभेत त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.


‘देशात समाजवाद्यांना जर कुणी धोका दिला असेल तर तो काँग्रेस वाल्यांनी दिला आहे. हे खरं आहे की आमचे गठबंधन होते. पण आम्हाला माहित नव्हतं की काँग्रेसमध्ये इतका जास्त गर्विष्ठ पणा आहे. गठबंधन त्यांच्यासाठी महत्त्वाचे नाही त्यांचा गर्व महत्त्वाचा आहे, अशी टीका अखिलेश यादव यांनी केली आहे.