
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱया अक्कलकोट नगरीमध्ये दर गुरुवारी मांस विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वामी भक्तांकडून गेल्या अनेक वर्षांपासून अक्कलकोट परिसरात गुरुवारी मांस विक्री करण्यास बंदी घालण्याची मागणी होत होती. मावाबंदीच्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर आता प्रत्येक गुरुवारी मांस विक्री बंद करण्याचा निर्णय नगर परिषदेकडून घेण्यात आला असल्याची माहिती नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांनी दिली.
























































