अकोला – 53 अहवाल प्राप्त, 11 पॉझिटीव्ह

661

आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे ५३ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ४२ अहवाल निगेटीव्ह तर ११ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज दुपारनंतर नऊ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातल्या दोन जणांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित सात जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.  दरम्यान काल (दि.३०) रात्री दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५८१ झाली आहे.  तर आजअखेर प्रत्यक्षात ११७ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

आज सकाळी प्राप्त अहवालात ११ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात पाच महिला व सहा पुरुष आहेत. त्यात  हरिहरपेठ येथील दोन, खदान, जी. वी. खदान, गायत्रीनगर कौलखेड रोड, गोडबोले प्लॉट,  फिरदौस कॉलनी, जुनेशहर,  तारफैल, जठारपेठ, सिंधी कॅम्प येथील रहिवासी आहेत. आज सायंकाळच्या अहवालात एकही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.

दोघांचा मृत्यू
दरम्यान काल रात्री दोन जण उपचार घेतांना मयत झाले आहेत. त्यात एक व्यक्ती संताजीनगर सुधीर कॉलनी सिव्हील लाईन येथील रहिवासी आहे. हा व्यक्ती २७ मे रोजी दाखल झाला होता. तर अन्य व्यक्ती बाळापुर येथील  असून हा व्यक्ती २६मे रोजी दाखल झाला होता. या दोघांचा काल रात्री उपचारा दरम्यान  मृत्यू झाला.

नऊ जणांना डिस्चार्ज
आज दुपारून नऊ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील सात जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले तर अन्य दोघांना घरी सोडण्यात आले. त्यात चार महिला व पाच पुरुष असून ते गोकुळ कॉलनी, फिरदौस कॉलनी,  न्यू खेतान नगर कौलखेड, रेल्वे स्टेशन,  अशोक नगर अकोट फैल,  खदान, हरिहरपेठ, गायत्री नगर , मोहम्मद अली रोड येथील रहिवासी आहेत.

११७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत ५८१ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील ३२ जण (एक आत्महत्या व ३१ कोरोनामुळे) मयत आहेत.  तर आज नऊ जणांना  डिस्चार्ज दिला आहे. आता डिस्चार्ज दिलेल्या  एकूण  व्यक्तींची संख्या ४३२ झाली आहे. तर सद्यस्थितीत ११७ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी तीन रुग्ण हे मुर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहेत तर एक जण कोविड केअर सेंटरला दाखल आहे. तर एका रुग्णाला नागपूर येथे संदर्भित करण्यात आले आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या