तृतीयपंथीयांसाठी अक्षयकुमारची दीड कोटीची मदत

801

लक्ष्मी बॉम्बचे दिग्दर्शक राघव लॉरेन्स हे तृतीयपंथीयांसाठी एक इमारत बांधणार असून त्यासाठी ते फंड गोळा करत आहेत. या फंडसाठी अक्षयकुमारने दीड कोटीची मदत केली आहे. राघव लॉरेन्स यांनी स्वतः सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली. ‘आम्ही लक्ष्मी बॉम्बचे शूटिंग करत असताना मी माझ्या या प्रोजेक्टविषयी अक्षयकुमारला सांगितले. त्यानंतर त्यांनी लगेचच या प्रोजेक्टला दीड कोटी देत असल्याचे सांगितले. अक्षय अगदी देवासारखे आमच्यासाठी धावून आले आहेत. मी या पाठिंब्यासाठी त्यांचे सर्व तृतीयपंथीयांकडून आभार मानतो. आम्ही लवकरच आमच्या प्रोजेक्टचे भूमिपूजन करू’ असे राघव लॉरेन्स यांनी सांगितले. राघव लॉरेन्स दिग्दर्शित ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटामध्ये अक्षयकुमार हा एका तृतीयपंथीयाच्या भुताच्या भूमिकेत दिसणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या