करिनाची ‘गुड न्यूज’, ट्विटरवर फोटो व्हायरल

2803
kareena-good-news

तैमूरमुळे सतत चर्चेत राहणारी करिनाचा आणखी फोटो चर्चेत आला आहे. यामध्ये करिनाचे बेबी बंप दिसते आहे. करिना सोबतच ‘कबिर सिंग’ मधील भूमिकेमुळे चर्चेत आलेली कियारा आडवाणी देखील बेबी बंपसह दिसत आहे. पण हे फोटो त्यांच्या येणाऱ्या चित्रपटाच्या पोस्टरचे आहेत. ‘गुड न्यूज’ असे या चित्रपटाचे नाव असून अक्षय कपूर, दिलजीत दोसांझ, करिना कपूर आणि कियारा आडवाणी हे चौघे प्रमुख कलाकार असणार आहेत.

अक्षय कुमारची फिल्म ‘गुड न्यूज’चं पोस्टर नुकतंच लाँच झालं आहे. अक्षय कुमारनं स्वत:च्या सोशल हँडलवरून या चित्रपटाचं पोस्टर पोस्ट केलं आहे. दोन महिलांच्या बेबी बंपमध्ये फसलेला अक्षय कुमार यामध्ये दिसतो आहे. या वर्षातील धम्माल फजिती दाखवणारा चित्रपट अशी टॅग लाईन देखील अक्षय कुमारनं दिली आहे. नाताळच्या सुट्टी दरम्यान म्हणजे 27 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

akshay-good-news

अक्षय कुमारसोबत करिना कपूर आणि कियारा आडवाणी या दोघी बेबी बंपचे फोटोशूट करत आहेत आणि त्यामध्ये दिलजीत दोसांझ आणि अक्षय कुमार फसले आहेत असं सध्या पाहायला मिळत आहे.

अक्षय कुमार आणि करिना कपूर 9 वर्षानंतर चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या आधी कमबख्त इश्कमध्ये त्यांनी काम केले होते. कियारा आणि दिलजीत दोसांझ यांची जोडी पहिल्यांदाच दिसणार आहेत. धर्मा प्रोडक्शन याचे निर्देशन करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाची कहाणी ही सरोगसीवर आधारित असण्याची शक्यता आहे. याआधी 2002 मध्ये या विषयावर ‘फिलहाल’ नावाचा चित्रपट बनला होता. या चित्रपटाचे निर्देशन मेघना गुलजार यांनी केलं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या