अक्षय कुमार बनणार ‘पृथ्वीराज चौहान’, पाहा टीझर

1143
file photo

अभिनेता अक्षय कुमार याचा आज वाढदिवस. खिलाडी कुमार अशी ओळख असलेल्या अक्षयने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. महान राजपूत योद्धा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित पृथ्वीराज या चित्रपटात अक्षय दिसणार आहे.

आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्याने या चित्रपटाचा अनाउन्समेंट टीझर पोस्ट केला आहे. यशराज फिल्मसची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी असणार आहेत. पुढल्या वर्षी दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या