Photo – राणादा आणि पाठकबाई अडकले लग्नाच्या बंधनात !

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेले राणा दा आणि पाठकबाई म्हणजेच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे आज लग्न बंधनात अडकले. पुण्यात हा विवाहसोहळा पार पडला. पारंपारिक पेहरावात दोघेही सुंदर दिसत होते. मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक मंडळींनी लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती. तसेच दोघांचे मित्र-मैत्रिणी, तसेच दोघांच्या प्रेम कहाणीचे साक्षीदार असलेले ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील सहकलाकारही अक्षता टाकण्यासाठी उपस्थित राहिले होते.