अल कायदा दहशतवादी मॉड्यूलची मास्टरमाइंड शमा परवीन जेरबंद; गुजरात ATS ने केली बंगळुरूतून अटक

अल कायदा दहशतवादी मॉड्यूल प्रकरणात गुजरात एटीएसला मोठे यश मिळाले आहे. गुजरात एटीएसने अल कायदा दहशतवादी मॉड्यूलची एक महिला दहशतवाद्याला बंगळुरू येथून अटक केली आहे. अल कायदा दहशतवादी मॉड्यूलची मास्टरमाइंड शमा परवीनला बंगळुरूतून अटक करण्यात आली आहे. कर्नाटकची रहिवासी शमा परवीन अल कायदाचे संपूर्ण मॉड्यूल चालवत होती. गुजरात एटीएसने कर्नाटकातून या महिला दहशतवाद्याला अटक केली आहे.

कर्नाटकची रहिवासी शमा परवीन ही अल कायदाचे संपूर्ण मॉड्यूल चालवत होती. या महिला दहशतवाद्याला गुजरात एटीएसने कर्नाटकातून अटक केली आहे. या संदर्भात चौकशी सुरू आहे. 30 वर्षीय शमा परवीन ही एक्यूआयएसची मुख्य महिला दहशतवादी आहे. यापूर्वी या मॉड्यूलच्या चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. दोघांना गुजरातमधून तर एकाला नोएडामधून आणि एकाला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता शमा परवीनला अटक करण्यात आल्याने हे एटीएसचे मोठे यश मानले जात आहे.