आळंदीत संत रोहिदास महाराज जयंती साजरी

श्री.संत गुरु रोहिदास महाराज यांची 644वी जयंती समस्त हराळे वैष्णव चर्मकार समाज धर्मशाळेच्या मंदिर सभागृहात कोरोना महामारीचे सावट असल्याने सर्व सरकारी नियमांचे पालन करुन मोजक्याच पदाधिकारी,समाज बांधवांचे उपस्थितीत साधेपणाने श्रींचे पूजन करून संत रोहिदास महाराज यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत अभिवादन व दिपप्रज्वलन करून साजरी करण्यात आली. विविध मान्यवरांनी आपले विचार मांडले.

कष्टकरी कामगार पंचायतचे अध्यक्ष मल्हार काळे, खेड तालुका मनसेचे अध्यक्ष प्रसाद बोराटे, भाजपाचे संघटन सरचिटणीस भागवत काटकर, आळंदी जनहित फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, संघटनेचे सल्लागार महादेव पाखरे, विश्वनाथ नेटके, शिवाजी गवळी, मारुती पाचारणे, लक्ष्मण नेटके, संदीपान घायाळ, राजु कांबळे, विकास नेटके, विकास गरुड यांचेसह मोजकेच समाज बांधव उपस्थित होते.

आभार राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष तुकाराम नेटके यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन हराळे वैष्णव चर्मकार समाज धर्मशाळेचे विश्वस्त व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे युवक अध्यक्ष तुषार नेटके यांनी केले. यावेळी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

आपली प्रतिक्रिया द्या