केरळची ट्रव्हेल कंपनी अलहिंद ग्रुपला एअरलाईन्स सुरू करण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयाने मंजुरी दिली. ‘अलहिंद एअर’ असे एअरलाईन्सचे नाव असेल. ‘अकासा एयर’ नंतर एव्हिएशनमध्ये उतरलेली ही दुसरी कंपनी आहे. हिंदुस्थानात एव्हिएशन सेक्टरमध्ये तेजी दिसतेय. त्यामुळे अनेक नव्या कंपन्यांची नजर या सेक्टरवर आहे.
अलहिंद ग्रुप या वर्षाअखेरपर्यंत एअरलाईन्स सेवा सुरू करू शकतो. त्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयाच्या एअर ऑपरेटर सर्टिफिकेटची आवश्यकता आहे. ते मिळाल्यानंतर अलहिंद एअरचे विमान उडेल. सुरुवातीच्या टप्प्यात दक्षिणेकडील राज्यांमध्ये ‘अकासा एयर’ सुरू होईल. कोची ते बंगळुरू, तिरुअनंतपुरम, चेन्नई येथून विमानसेवेचा शुभारंभ होईल. त्यानंतर विस्तार केला जाईल. येत्या दोन वर्षांत 20 मोठी विमाने ‘अकासा एयर’कडे असतील.