बॉलिवूडमधील यशाचे ‘हे’ आहे रहस्य, आलियाने केला खुलासा

648

‘स्टुडंट ऑफ द ईयर’ चित्रपटाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या आलिया भट ही आता इंडस्ट्रीतील अनुभवी आणि यशस्वी अभिनेत्री झाली आहे. 2012 ते 2019 या सात वर्षात आलियाने विविध भूमिकांनी मोठा पडदा गाजवला. यादरम्यान तिने अनेक हिट चित्रपट दिले. दिसायला गोड असणाऱ्या चुलबुली आलियाने आपल्या मेहनतीच्या बळावर इंडस्ट्रीमध्ये नाव कमावले आहे. तिच्या लूक, डान्स, ड्रेसची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. परंतु तिच्या या यशाचे रहस्य नक्की आहे तरी काय. याबाबत खुद्द तिनेच खुलासा केला आहे.

‘हिंदुस्थान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, आलिया म्हणते मी लहानपणापासून कॉम्पटेटिव्ह आहे. परंतु एखाद्या धावण्याच्या स्पर्धेत खेळाडू आजूबाजूला न पाहता सरळ पळत राहतात तसे माझे नाही. कारण चित्रपट ही काय धावण्याची स्पर्धा नाही. मला नाही वाटत कोणतेही रचनात्मक, निर्मितेचे काम एखाद्या धावण्याच्या स्पर्धेसारखे असेल, कारण त्यामुळे ते तुम्ही ते खराब कराल.

आलिया पुढे म्हणाली, मला असे वाटते की स्पर्धेत टिकून राहणे जास्त आवश्यक आहे. तुम्ही पहिले असो, बारावे असो किंवा अन्य कोणत्या नंबरवर. तुम्ही सांगितलेला मेसेज नेहमीच आठवणीत राहायला हवा किंवा तशा चित्रपटांचे तुम्ही एक भाग तरी असायला हवे. जसे मी फोकस करतेय, त्या गोष्टी मला अशाच नाही मिळाल्या, त्यासाठी मला स्पर्धा करावी लागली, परंतु स्वत:सोबतच. कारण स्वत:शी स्पर्धा करूनच तुम्ही जिंकू शकता.

नुकतेच एक पुस्तक वाचले. यात आयुष्यात आपण एक लक्ष्य निर्धारित करतो. तिथपर्यंत पोहोचलो की पुढे काय करायचे? पुढे जावे की नाही? हे माहिती नसते. मी स्वत: कोणतेही लक्ष्य निर्धारित केलेले नाही. मला जे मिळते त्यापेक्षा थोडेसे अधिक मिळवणे मला आवडते. त्यामुळे पुढे जाण्याची जिद्द वाढते, असे आलिया म्हणाली.

आपली प्रतिक्रिया द्या