ही भयंकर अडाणी आहे! नेटकऱ्यांनी आलिया भटला केलं ट्रोल

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट ही बऱ्याचदा वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. कधी तिच्या अभिनयावरून तर कधी तिच्या खासगी आयुष्यावरून तिची चर्चा होते. अनेकदाने आलिया सामान्य ज्ञानाच्या प्रश्नांची चुकीची उत्तरं देऊन लोकांना खिल्ली उडवायला निमित्त दिलं आहे.

अर्थात करिअरच्या सुरुवातीला ती अशा प्रकारची उत्तर देऊन बरीच ट्रोल व्हायची. मध्यंतरीच्या काळात तिच्या अभिनयाने तिने लोकांची मनं जिंकली होती. त्यामुळे तिची चुकीची उत्तरं देऊन खिल्ली उडवून घेण्याची सवय लोक विसरले होते. पण आलियाने नुकतीच एक अशी पोस्ट केली की ज्यामुळे तिला पुन्हा याच कारणासाठी ट्रोल व्हावं लागलं आहे.

आलियाने हिंदुस्थानी खेळाडूंना ऑलिम्पिकसाठी शुभेच्छा देण्यासाठी एक पोस्ट शेअर केली आणि लोकांनी पुन्हा तिची खिल्ली उडवायला सुरुवात केली. अर्थात त्याला कारणही तसंच होतं.

तिने ऑलिम्पिकमधला हिंदुस्थानी खेळाडूंच्या ताफ्याचा ओळख सलामी वेळी काढलेला फोटो शेअर केला. त्याखाली तिने त्यांना शुभेच्छाही दिल्या. पण तिच्याकडून एक चूक झाली. कारण तिला वाटलेला टोकियो ऑलिम्पिकचा तो फोटो नेमका लंडन ऑलिम्पिकचा होता.

aliabhatt-insta-olympic

तिने या फोटोला टोकियो ऑलिम्पिकची कॅप्शन देत खेळाडूंना शुभेच्छाही दिल्या. त्यावर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. सगळं काही सोडून आधी आलियाची इन्स्टा स्टोरी पाहा. ती खरोखर मंद आहे, अशा अर्थाचे अनेक ट्वीट्स नेटकऱ्यांनी केले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या