अलिबाग बाजारपेठेतील चार दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी

436

अलिबाग शहरातील एका मोबाईल शॉपला आग लागली. या आगीत शेजारची अन्य तीन दुकानेही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आहेत. सोमवारी पहाटेच्या सुमारास ही आग लागल्याचे कळते. मात्र ही आग नक्की कशाने लागली हे अद्याप कळलेले नाही.

शहरातील बाजारपेठेमधील अंकुर सुपर मार्केटसमोर असलेल्या नेहा मोबाईल शॉप आहे. या शॉपला पहाटे अचानक आग लागली. आग वेगाने पसरल्यामुळे बाजूची तीन दुकानेही जळून खाक झाली. आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

अलिबाग नगरपालिका आणि आरसीएफच्या अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणली आहे. मात्र या आगी मागचे कारण कळलेले नाही. मात्र दुकानदाराचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या