चिकित्सकांची 9 नोव्हेंबरला जनजागृती मोहीम

399

आरोग्य क्षेत्रात व्यावसायिक चिकित्सा पद्धतीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी तसेच दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी अखिल भारतीय व्यावसायिक चिकित्सक संघटनेतर्फे (एआयओटीए) 27 ऑक्टोबरपासून देशभरात जनजागृती मोहिमेचे आयोजन केले आहे.

महिनाभर चालणाऱया या मोहिमेचा भाग म्हणून 9 नोव्हेंबर रोजी केईएम रुग्णालय आणि जी.एस. वैद्यकीय महाविद्यालय परिसर या ठिकाणी आयोजित पदयात्रा आणि पथनाटय़ांमध्ये मोठय़ा संख्येने व्यावसायिक चिकित्सक सहभागी होणार आहेत. आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिक चिकित्सेचे महत्त्व सांगणारी पथनाटय़े या दरम्यान सादर केली जाणार आहेत.

यासंदर्भात एआयओटीएचे अध्यक्ष डॉ. अनिल के. श्रीवास्तव म्हणाले, ‘‘आजघडीला अनेक देशांमध्ये व्यावसायिक चिकित्सा पद्धतीला आरोग्य क्षेत्रातील व्यवसाय म्हणून मान्यता आहे. या विषयातील नियामक संस्थाही अनेक देशांमध्ये आहेत; परंतु देशात मात्र याउलट परिस्थिती आहे. त्यात बदल व्हावा आणि व्यावसायिक चिकित्सा पद्धतीला मान्यता मिळावी, असा आमचा प्रयत्न

आपली प्रतिक्रिया द्या