सर्वपक्षीय आमदारांना दिल्लीत शिवसेनेचे चहा-पान, पवारांचे जेवण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sanjay-raut-sharad-pawar

दिल्लीत संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत सध्या दिल्लीत आहे. याचवेळी राज्यातील विधान परिषद आणि विधानसभा सदस्य संजय राऊत यांची भेट घेणार आहेत. या सर्वपक्षीय आमदारांसाठी चहापानाचे आयोजन करण्यात आले आहे. तर हे सर्व आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याकडे भोजनाचा आनंद घेतील.

दिल्ली येथे अभ्यासवर्गासाठी आलेल्या सन्माननीय विधानपरिषद व विधानसभा आमदारांच्या सन्मानार्थ शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या घरी चहापानचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी 05 एप्रिल, 2022 रोजी सायंकाळी 06 वाजता दिल्ली येथील 15, सफदरजंग लेन निवासस्थानी याचे आयोजन करण्यात आले आहे. तर या सर्वपक्षीय आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याकडे भोजनासाठी आमंत्रण देण्यात आले आहे.