
देशभरातील उद्योगधंदे, व्यापार, बंदरे, रेल्वे आणि इतर सार्वजनिक सेवा उद्योगांचे खासगीकरण करून ते अदानीला देण्याचा चंग पेंद्रातल्या भाजप सरकारने बांधला आहे. या विरोधात प्रभादेवीमधील भूपेश गुप्ता भवनमध्ये रविवारी विविध संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 4 वाजता होणाऱ्या बैठकीला विविध सामाजिक, राजकीय संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
पेंद्र सरकारने विमानतळे, रेल्वे, खाणी, पाणी, वीजनिर्मिती आणि वितरण, बंदरे, मच्छीमार, बँकिंग सेवा, सुरक्षा विभाग, कारखाने, धारावी व इतर वस्त्या अदानी समूहाला देण्याचा सपाटा लावला आहे. या अदानीकरणाविरोधात संघर्ष करण्यासाठी रविवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यात सर्व संघटनांच्या वतीने संयुक्त कृती कार्यक्रमावर चर्चा करून एकजुटीने निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती आयटक राष्ट्रीय सचिव सुकुमार दामले यांनी दिली.