आयपीएलमधील ‘या’ संघाविरोधात खेळण्यात रोहित शर्माला मिळतो आनंद

आयपीएल 13 चा सलामीचा सामना शनिवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणार आहे. अबुधाबीतील शेख जायेद स्टेडियममध्ये हा समाना खेळवण्यात येणार आहे. या सलामीच्या समान्यापूर्वी आपल्याला कोणत्या संघाशी खेळायला आवडते, कोणत्या संघाशी खेळण्यात मजा येते आणि आनंद मिळतो याबाबत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने संघाच्या ट्विटर हँडलवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघाविरोधात खेळण्यात आपल्याला नेहमीच मजा येते आणि आवडते असे रोहितने सांगितले. आयपीएलमध्ये आधीच्या पर्वात दोन्ही संघात अंतिम सामना रंगला होता. त्यावेळी मुंबई इंडिन्सने विजय मिळवत चौथ्यांदा चषक पटकावला होता. मुंबई इंडियन्स संघाच्या ट्विटर हँडलवर रोहितने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्याने म्हटले आहे की, चेन्नई संघाविरोधात खेळण्यात नेहमी मजा येते. या सामन्यात आनंद अनुभवता येतो. सामन्याच्या वेळी आम्ही विरोधी संघ असतो. त्यानंतर मात्र आम्ही सर्वजण एकत्र येतो. कोणाच्याही मनावर सामन्यातील कोणत्याही गोष्टीचा परिणाम होत नाही. आयपीएलच्या सर्वच संघामध्ये अशी एकजुटीची भावना आहे, हेच या सामन्यांचे वैशिष्ट्य असल्याचे रोहितने सांगितले. मोठ्या ब्रेकनंतर धोनी मैदानावर उतरत असल्यामुळे सामन्याची रंगत वाढणार आहे.

आयपीएलमध्ये क्रिकेट रसिकांना सर्वाधिक आवडणाऱ्या दोन संघामध्ये शनिवारी सामना होत आहे. या दोन्ही संघातील सामन्याची अनेकांना प्रतीक्षा असते. हे दोन संघ क्रिकेट रसिकांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यामुळे शनिवारी होणारा सामना महत्त्वाचा आहे. तसेच या सामन्याने या पर्वाची सुरुवात होत असल्याने हे पर्वही रंगतदार होईल ,असे अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या