नोबेल विजेते ‘अमर्त्य सेन’ यांच्या पत्नीचे निधन

अर्थशास्त्रात नोबेल पुरस्कार विजेते डॉ. अमर्त्य सेन यांच्या पहिल्या पत्नी नवनीता सेन यांचे दिर्घ आजाराने गुरुवारी निधन झाले. दक्षिण कोलकातामध्ये त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 81 वर्षाचे होत्या. नवनीता यांना हिंदुस्थान सरकारने साहित्य अकादमी पुरस्कार व 2000 साली पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे.

नवनीता सेन यांची आई राधारानी देव व वडील नरेंद्रनाथ देव हे दोघेही कवी होते. नवनीता सेन या कवयीत्री, कादंबरीकार, स्तंभलेखक, लघुकथा लेखक म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांनी 80 हून जास्त पुस्तके बंगाली भाषेत प्रकाशित केली आहेत. 1959 साली त्यांची ‘प्रथम प्रत्यय’ ही पहीली कविता प्रकाशित झाली. नवनीता देव यांचे 1958 साली डॉ. अमर्त्य सेन यांच्या सोबत विवाह झाला.

त्या बऱ्याच दिवसा पासून कर्करोगाने आजारी होत्या असे समजते. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत जात होती. गेल्या काही दिवसांपासून त्या बोलुही शकत नव्हत्या. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नवनीता यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ‘प्रसिद्ध साहित्यकार नवनीता देव सेन यांच्या निधनावर मी खुप दुखी झाले आहे. त्यांच्या जाण्याने त्यांच्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुखात मी सहभागी आहे’, असे ट्विट ममता बॅनर्जी यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या