
अॅमेझॉनने व्हिसा मिळण्यास विलंब होत असल्यामुळे हिंदुस्थानात अडकलेल्या काही कर्मचाऱयांना मार्चच्या सुरुवातीपर्यंत वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी दिली आहे. पण काही कठोर निर्बंध घातले आहेत. कर्मचाऱ्यांना कोडिंगचे काम, डॉक्युमेंटेशन करता येणार नाही. करारावर स्वाक्षरीदेखील करता येणार नाही.
17 डिसेंबरच्या एका अंतर्गत मेमोनुसार, जे कर्मचारी हिंदुस्थानात व्हिसा मिळण्याची वाट पाहत आहेत, ते 2 मार्च 2026 पर्यंत वर्क फ्रॉम होम करू शकतात, पण या तात्पुरत्या व्यवस्थेमध्ये त्यांना सर्व प्रकारचे काम करता येणार नाही. कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या कोडिंगचे काम करण्याची परवानगी नाही, ज्यात ट्रबलशूटिंग, टेस्टिंग आणि डॉक्युमेंटेशनचा समावेश आहे. त्यांना धोरणात्मक व्यावसायिक निर्णय घेणे, वाटाघाटी करणे किंवा करारांवर स्वाक्षरी करणे, तसेच ग्राहकांशी संवाद साधणे देखील मनाई आहे. याव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांना हिंदुस्थानात अॅमेझॉनच्या कार्यालयांमधून काम करण्यास किंवा कार्यालयांत जाण्यास परवानगी नाही.
ट्रम्प प्रशासनाने एच-1 बी व्हिसा कार्यक्रमात केलेल्या बदलांमुळे व्हिसा प्रक्रियेत विलंब होत आहे. त्यामुळे अमेरिकन कंपन्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.




























































