Amazon आणि Flipkart वर सेल, 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळण्याची शक्यता

Amazon आणि Flipkart ने आपल्या वार्षिक सेलची घोषणा केली आहे. त्याचा टीजरही लॉन्च करण्यात आला आहे. Amazon वर लवकरच ग्रेट इंडियन सेल लागणार आहे. तर फ्लिपकार्टवर बिग बिलियन्स डे येणार आहे. या सेलच्या तारखा अद्याप जाहीर करण्यात आल्या नाहियेत. परंतु या सेलमध्ये गब्ब्बर डिस्काऊंट मिळणार आहे.


ऍमेझॉन आणि फ़्लिपकार्टवर प्रत्येक कॅटेगरीतील वस्तूंवर डिस्काऊंट मिळणार आहे. त्यात प्रामुख्याने स्मार्टफोन आणि गॅझेट्सचा समावेश आहे. ऍमेझॉनवर सेल दरम्यान एचडीएफसीचे क्रेडिट कार्डवर शॉपिंग केल्यास 10 टक्यांपर्यंत अतिरिक्त डिस्काऊंट मिळेल. तर फ्लिपकार्टवर एसबीआयच्या क्रेडिट कार्डवर शॉपिंग केल्यास 10 टक्क्यांचे डिस्काऊंट मिळणार आहे.

ऍमेझॉनवर प्राईम मेंबर्ससाठी सेल लवकर सुरू होणार आहे. त्यानंतर इतर ग्राहकांसाठी हा सेल सुरू राहील. फ्लिपकार्टवरही फ्लिपकार्ट प्लस युजर्ससाठी सेल आधी सुरू होईल त्यानंतर इतर ग्राहकांसाठी हा सेल सुरू होईल. ऍमेझॉन वर 13 हजार पर्यंट सूट मिळण्याची शक्यता आहे. तर फ़्लिपकार्टवर 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळण्याची शक्यत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या