ऍमेझॉनच्या जेफ बेजॉसचे 1171 कोटींचे आलिशान घर

amazon-boss-jeff-bezos

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या ऍमेझॉनच्या जेफ बेजॉस यांनी लॉस एंजेलिस येथे 16.5 कोटी डॉलर्स म्हणजे सुमारे 1171 कोटी रुपयांचे आलिशान घर खरेदी केले आहे. लॉस एंजेलिसमधील महागडय़ा प्रॉपर्टीचा हा एक रेकॉर्डच समजला जात आहे. जेफ बेजॉस यांच्या बंगल्याचे नाव ‘वॉर्नर एस्टेट’ असून तो बेवर्ली हिल्स भागात नऊ एकरांत पसरलेला आहे. त्यामध्ये गेस्ट हाऊस, टेनिस कोर्ट आणि गोल्फ कोर्ससह अनेक गोष्टी आहेत. वॉर्नर ब्रदर्सचे मुख्य अध्यक्ष जॅक वॉर्नर यांनी हा बंगला 1930 साली उभा केला होता. बेजॉस यांनी डेव्हिड गेफेन यांच्याकडून तो खरेदी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या