देशातील 300 शहरांमध्ये अॅमेझॉनकडून पॅन्ट्री सर्व्हिसचा विस्तार

124

देशभरातील 300 शहरांमध्ये अॅमेझॉन पॅन्ट्रीचा (‘Amazon Pantry’)विस्तार करण्याची घोषणा अॅमेझॉनने केली. आता अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, जालना, लातूर, नांदेड, परभणी, रत्नागिरी, सातारा आणि सोलापूर येथील ग्राहकांना अॅमेझॉन पॅन्ट्रीवर किराण्याची मागणी करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. अॅमेझॉन पॅन्ट्रीसह, ग्राहकांना ब्रॅण्डेड एफएमसीजी (FMCG) उत्पादनांच्या मासिक किराण्यावर आणि दैनंदिन वापराच्या गोष्टींवर आता 35 टक्क्यांपर्यंतची सूट मिळू शकते. ते आता 200 पेक्षा जास्त ब्रॅण्डच्या 3000 उत्पादनांची निवड करून ते त्यांच्या घरी 1 ते 2 दिवसातच मिळू शकतात. बंगळुरू, दिल्ली, मुंबई, चेन्नई, हैदराबाद, कलकत्ता आणि पूणे येथील ग्राहक आता त्यांचा किराणा मिळवण्यासाठी टाइम स्लॉटमधून वेळ निवडू शकतात.

या विस्ताराबद्दल बोलतांना, अॅमेझॉन इंडियाचे कॅटेगरी मॅनेजमेंटचे संचालक सौरभ श्रीवास्तव म्हणाले, “अॅमेझॉनमध्ये, आम्ही आमच्या ग्राहकांसाठी ‘प्रत्येक गोष्ट’ आणि ‘प्रत्येक दिवशी’ यासाठी वचनबद्ध आहोत. अॅमेझॉन पॅन्ट्रीने उत्तम बचतीसोबतच ग्राहकांची किराणा मागणी पूर्ण केल्यामुळे ते लोकप्रिय झाले आहे. या विस्तारासह 300 पेक्षा जात शहरे आणि गावांमधील ग्राहक आता अत्यावश्यक असा किराणा त्यांच्या घरीच मिळवू शकतात.” अॅमेझॉन पॅन्ट्री आता 10,000 पेक्षा जास्त पिनकोडसाठी उपलब्ध असेल. अॅमेझॉन पॅन्ट्रीवर सहभागी विक्रेते मुख्य वस्तू, स्वयंपाकासंबंधित अत्यावश्यक वस्तू, स्नॅक्स, पेय, पॅक फूड, घरगुती वस्तू, पर्सनल केयर, स्कीन केयर, पेट फूड, बेबी प्रॉडक्ट्स, डायपर व बेबी फूड यांसारख्या बऱ्याच उत्पादनांची सुविधा उपलब्ध आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या