‘ब्रीद’च्या दुसऱ्या सिझनमध्ये हृषिकेश जोशी

1387

‘ब्रीद’ या वेबसिरीजचा पहिला सिझन गाजल्यानंतर आता दुसरा सिझन येत असून त्यामध्ये अभिषेक बच्चनबरोबर हृषिकेश जोशी महत्त्काच्या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्या सिझनमधील हृषिकेशच्या कामाचे सर्व प्रेक्षकांनी, समीक्षकांनी खूप कौतुक केले. त्यामुळे दुसऱया सिझनमध्ये हृषिकेशच्या भूमिकेमध्ये काही अधिक चांगले बदल करून ती महत्वाची केली आहे. दुसऱया सिझनमध्ये हृषिकेशचा इन्स्पेक्टर प्रकाश अक्षरश: धमाल करणार आहे.

‘पहिल्या सिझनला आणि त्यातील माझ्या व्यक्तिरेखेला जो प्रतिसाद मिळाला त्यानंतर निर्मात्यांनी मला बोलावून सांगितले की, माझी व्यक्तिरेखा इथून पुढे सर्व सिझनमध्ये कायम राहणार आहे आणि अधिकाधिक महत्वाची होत जाणार आहे. त्यानुसार दुसऱया सिझनमध्ये माझ्या व्यक्तिरेखेला धरून गोष्ट लिहिली गेली’ असे हृषिकेशने सांगितले. ‘ब्रीद -2’ हा सिझन अॅमॅझॉनवर प्राईमवर 10 जुलै रोजी दाखल होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या