तिरंगा छापलेले बूट विकले, राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी अॅमेझॉनविरोधात तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तिरंगा छापलेल्या साहित्याची विक्री करून राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी अॅमेझॉन या शॉपिंग साईटविरोधात तक्रार दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे आदेश मध्य प्रदेश सरकारने दिले आहेत.

तिरंगा छापलेलं खाण्या-पिण्याचं सामान तसंच बूट यांमुळे राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याने नेटकऱ्यांनी तीव्र विरोध केला होता. त्यामुळे अॅमेझॉनविरोधात तक्रार करण्याचे आदेश मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिले आहेत.

मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅमेझॉन या शॉपिंग साईटवर तिरंग्याचा अपमान झाल्याच्या तक्रारी आम्हाला प्राप्त झाल्या आहेत. बुटांवर तिरंगा छापला जातो ही बाब दुर्लक्षित केली जाऊ शकत नाही. हे नॅशनल फ्लॅग कोड उल्लंघनाचं प्रकरण आहे, असं मिश्रा म्हणाले आहेत. दरम्यान, अॅमेझॉनने या संबंधित विक्रेत्याविरोधात कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.