वाल्मीक कराड जेलमधून सक्रीय; माझ्यासमोर बसलेल्या व्यक्तीला फोन, अंबादास दानवेंचा दावा

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कारागृहात असलेल्या वाल्मीक कराडला व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत आहे. माझ्यासमोर बसलेल्या व्यक्तीला वाल्मीक कराडचा पह्न आल्याचा दावा विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. त्यांच्या या दाव्याने खळबळ उडाली असून,  बीड कारागृहाचा कारभार पुन्हा चव्हाटय़ावर आला आहे.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले की, माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा विश्वासू वाल्मीक कराड सध्या बीड जिल्हा कारागृहात खडी फोडत आहे. त्याला तिथे व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असून, पण पुढे काहीच होत नाही. मुंबई उच्च न्यायालयाने कृषी साहित्य खरेदी प्रकरणात धनंजय मुंडे यांना कथित क्लीनचिट दिली आहे. दानवे यांनी यावर भाष्य करताना राज्याच्या कषी खात्यात नैतिकदृष्टय़ा घोटाळा झाला आहे, असे ते म्हणाले.