महाराष्ट्राच्या हाती केंद्र सरकार केवळ तुरी देतं असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. महााराष्ट्र केंद्र सरकारला 100 रुपये जीएसटी देतो तर केंद्र सरकर राज्याला परत 7 रुपये देतात असे दानवे म्हणाले आहेत.
एक्स वर पोस्ट करून दानवे म्हणाले की, महाराष्ट्राच्या हाती केंद्र सरकार केवळ तुरी देतं याचा यापेक्षा मोठा पुरावा काय असू शकतो. महाराष्ट्र देशाच्या जीएसटी संकलनामध्ये सर्वाधिक भर घालतो. मात्र महाराष्ट्राने दिलेल्या 100 रूपायांपैकी केवळ 7 रुपये महाराष्ट्राला परत मिळतात जे देशात अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी आहेत. याच्या तुलनेत भाजपशासित गुजरातला 31.30 रुपये, मध्यप्रदेश 27.1 रुपये, उत्तर प्रदेश 332.2रुपये, बिहार 922.5 रुपये मिळतात. मग महायुतीचे नेते कोणत्या तोंडाने सांगतात की केंद्र आम्हाला भरभरून मदत करते? महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारचा आकस हा सरकार बदलले तरी कायम आहे, हेच यातून स्पष्ट होते असेही दानवे म्हणाले.
महाराष्ट्राच्या हाती केंद्र सरकार केवळ तुरी देतं याचा यापेक्षा मोठा पुरावा काय असू शकतो. महाराष्ट्र देशाच्या जीएसटी संकलनामध्ये सर्वाधिक भर घालतो. मात्र महाराष्ट्राने दिलेल्या १०० रूपायांपैकी केवळ ७ रुपये महाराष्ट्राला परत मिळतात जे देशात अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी आहेत.… pic.twitter.com/AM9xbioqGk
— Ambadas Danve (@iambadasdanve) October 17, 2024