
फलटणमध्ये एका डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली होती. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः तपास केला का असा सवाल उपस्थित केला. तसेच फडणवीस अशा लोकांसोबत कार्यक्रम करत असतील तर प्रशासनाचे मनोबल खचतं असेही अंबादास दानवे म्हणाले.
आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन अंबादास दानवे म्हणाले की, एवढे आरोप झालेल्या व्यक्तीबरोबर जर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जर कार्यक्रम करत असतील तर मला वाटतं प्रशासनाचं मनोबल सुद्धा याच्यातून तुटतं. मुख्यमंत्री तपास अधिकारी झाले का? मुख्यमंत्र्यांनी तपास केला का या सगळ्या विषयाचा? या प्रकरणाची चौकशी जर फलटणच्या कोणत्याही अधिकाऱ्याने केली तर तो क्लीन चीटच देणार. म्हणून बाहेरच्या अधिकाऱ्यांना इथं चौकशी दिली पाहिजे. मगच मुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षाच्या पोहोचलेल्या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना क्लीन चीट द्यावी असेही अंबादास दानवे म्हणाले.























































