
उमेदवार हा दुसरा तिसरा कोणी नसून मशालच उमेदवार आहे. मशाल चिन्ह घेऊन मतदारापर्यंत जा. विजय निश्चितच आपला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सर्वसामान्य व शेतकऱ्यांच्या हितासाठी व त्यांच्या उज्वल भविष्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केल. करंजखेड येथे शिवसेनेच्या संवाद दौऱ्यात ते बोलत होते.
यावेळी माजी आमदार उदयसिंग राजपूत यांनी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये मशाल हे चिन्ह घेऊन मतदारापर्यंत जाऊन जास्तीत जास्त आपल्या पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) व भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शेतकरी सेनेचे जिल्हा संघटक बाबासाहेब मोहिते, तालुकाप्रमुख संजय मोटे, शिवसेना महिला आघाडीच्या सरपंच रुपाली मोहिते, करंजखेडचे माजी सरपंच हय्यास सय्यद, उपतालुकाप्रमुख संजय राजपूत, मेघश्याम तायडे, विठ्ठल मनगटे, विभागप्रमुख अनिल चव्हाण, उपविभाग प्रमुख बाबुराव सोनवणे, नाना येवले, रामेश्वर ताजने, अंबादास जाधव, आप्पा बोराडे, योगेश जंजाळ, विलास निकम, नाशिकराव काळे, शिवाजी नागोडे, कृष्णा सहाने, एकलव्य संघटनेचे रमेश माळी, एकनाथ मोरे, चिमणापूरचे सरपंच परमेश्वर सोळुंके, माजी सरपंच रवींद्र ढोणे, आप्पासाहेब देशमुख, नामदेव अहिरे, रोहिदास ढोणे, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर जाधव, ममराज पवार, सचिन जाधव, सागर मातेरे, नथ्थू गांगड, मुजाहिद खान, परवेज खान, जावेद शेख, ओंकार पवार, पूनमचंद पवार, रामचंद्र चव्हाण, नितीन राठोड, गोकुळ सोळुंके, विलास मोटे, अनिल सपकाळ, सौरभ ढोणे, विनोद सोळुंके, अतुल सोळुंके, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व करंजखेड परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यकर्ते शिवसेनेत
कन्नड तालुक्यातील करंजखेड जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठे खिंडार पडले आहे. करंजखेड जिल्हा परिषद गटातील नागापूर, धामणी, वाकी, उंबरखेड, उंबरखेडतांडा, सावरगाव, चिमणापूर, घाटशेंद्रा, गणेशपूर गावातील कार्यकत्यांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला. शाखाप्रमुख अमोल ढोणे, अनिल डवणे, पोपट निकम, कृष्णा सहाने, जादूसिंग बैनाडे, योगेश जंजाळ, मुज्जाहीद खान, सचिन जाधव, राजू पवार आदींसह कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.



























































