लोकसभा निवडणुकीला फटका बसल्याने विधानसभा निवडणुकीमध्ये मते मिळवण्यासाठी मिंधे सरकार विविध योजना सुरू करत असून यात ‘लाडकी बहीण’ ही प्रमुख योजना आहे. मात्र या योजनेवरून महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाने दिलेल्या जाहीरातीवरून मिंधे व अजित पवार गटात वादाची ठिणगी पडली. त्या जाहीरातातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही फोटो वापरण्यात आलेला नव्हता. त्यामुळे महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर आली होती.
सहकारी पक्षांची गरज संपत आली की असे बॅनरवरून उपमुख्यमंत्री अजित पवार गायब होतात. लाडकी बहीण योजनेच्या नावातील ‘मुख्यमंत्री’ हा शब्द गायब केला आहे. ताटातील चटणी सारखा मुख्यमंत्री शिंदेचा फोटो तेवढा शिल्लक आहे! निवडणूक संपली की त्यांनाही ‘तुम कौन.. हम कौन’ असंच दिसतंय!
(बॅनर स्थळ… pic.twitter.com/8cC5vNLzuw
— Ambadas Danve (@iambadasdanve) October 1, 2024
आता लाडकी बहिण योजनेवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छत्रपती संभाजीनगर येथे पोस्टर लागले असून त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अगदी छोटा फोटो लावण्यात आला आहे. अजित पवार यांचा तर फोटो देखील नाहीए. या पोस्टरमधून लाडकी बहिण योजनेचे सर्व श्रेय देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचे दिसून येत आहे.
यावरून विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते व शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी मिंधे गटाला जोरादार टोला लगावला आहे. ”सहकारी पक्षांची गरज संपत आली की असे बॅनरवरून उपमुख्यमंत्री अजित पवार गायब होतात. लाडकी बहीण योजनेच्या नावातील ‘मुख्यमंत्री’ हा शब्द गायब केला आहे. ताटातील चटणी सारखा मुख्यमंत्री शिंदेचा फोटो तेवढा शिल्लक आहे! निवडणूक संपली की त्यांनाही ‘तुम कौन.. हम कौन’ असंच दिसतंय”, असा टोला दानवे यांनी लगावला आहे.