
आरक्षणाची कोंडी सोडवण्यासाठी सरकार चर्चेला का येत नाही? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.
अंबादास दानवे म्हणाले की, “आरक्षणाची कोंडी सोडवण्याची सरकारची इच्छाशक्ती दिसत नाही. सरकारने इच्छाशक्ती दाखवली तर ही कोंडी सुटेल. सरकारने दोन पावले पुढे येण्याची आवश्यकता आहे. पण सरकार दोन पावलं पुढे येण्याऐवजी स्वतःची पावलं मागं घेत आहे.”
ते म्हणाले, “हैदाबाद आणि सातारा गॅजेट यामध्ये मराठ्यांना ओबीसी म्हटलं आहे. यात त्यांना ओबीसींचा दर्जा दिला आहे. तोच ते (मराठा आंदोलक) मागत आहेत, ते द्यायची तयारी सरकारने करावी.”






























































