द्यायची दानत नाही तर घोषणा करता कशाला? अंबादास दानवे यांचा संतप्त सवाल

मिंधे सरकारने घटनाबाह्य सरकार स्थापन केल्यानंतर दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याची घोषणा केली होती तसेच इतर खेळाप्रमाणे 5 टक्के क्रीडा आरक्षणाचा लाभ मिळेल असेही जाहीर केले होते. मोठ मोठे दावे करत विधानसभेत घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच घोषणेचा विसर पडला आहे. दोन वर्षांनंतरही याबाबत सरकारने निर्णय घेतलेला नाही. त्यावरून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला फटकारले आहे.

”जेवढे उंच थर गोविंदा पथक लावतात, त्यापेक्षा किती तरी अधिक उंचीचे खोटे हे सरकार, मुख्यमंत्री आणि त्यांचे दोन उपमुख्यमंत्री बोलतात. गोविंदाना 5 टक्के आरक्षण देण्याची घोषणा 2 वर्षांपूर्वी झाली, अजून त्याच्या शासन निर्णयाचा कागद नाही. लाभ लांबच! द्यायची दानत नाही तर घोषणा करता कशाला? माझे आवाहन आहे गोविंदाना, की या खोटरड्यांच्या हस्ते एकही बक्षिसे घेऊ नका” असे आवाहन अंबादास दानवे यांनी केले आहे.