
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. अधिवेशनाआधी सत्ताधारी व विरोधकांनी विधिमंडळाच्या आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. यावेळी सत्ताधाऱ्यांनी महाराजांच्या पुतळ्यासोबत काढलेल्या फोटोत महायुतीच्या आमदारांनी चक्क छत्रपती शिवाजी महाराजांनाच झाकले. या फोटोत महायुतीच्या आमदारांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील आहेत.
हे सत्ताधारी आणि विरोधकांचे दोन वेगवेगळे फोटो बघा..
हिंदी सक्तीसारखे हुकूमशाही निर्णय लादू पाहणारे आज छत्रपती शिवाजी महाराजांना पूर्ण झाकून नारेबाजीचे थोतांड करताना दिसले. ज्या राजांच्या विचारांना तिलांजली दिली, त्यांना दिसु तरी का द्यायचे ना. भाऊ-भाई-दादा दिसले, बस्स झालं!… pic.twitter.com/XgU4YT5GE9
— Ambadas Danve (@iambadasdanve) June 30, 2025
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तो फोटो शेअर करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. दानवे यांनी सत्ताधारी व विरोधक असा दोघांचाही छत्रपतींच्या पुतळ्याजवळचा फोटो शेअर करून महायुतीला फटकारले आहे.
”हे सत्ताधारी आणि विरोधकांचे दोन वेगवेगळे फोटो बघा. हिंदी सक्तीसारखे हुकूमशाही निर्णय लादू पाहणारे आज छत्रपती शिवाजी महाराजांना पूर्ण झाकून नारेबाजीचे थोतांड करताना दिसले. ज्या राजांच्या विचारांना तिलांजली दिली, त्यांना दिसु तरी का द्यायचे ना. भाऊ-भाई-दादा दिसले, बस्स झालं”, असे दानवे यांनी ट्विट केले आहे.