अंबादास दानवेंची जालन्यातील गजकेसरी स्टील कंपनीस भेट; दुर्घटनाप्रकरणी कंपनी मालकावर कारवाई करण्याची मागणी

जालन्यातील औद्योगिक परिसरात 24 ऑगस्ट रोजी गजकेसरी स्टील कंपनीत लोखंड वितळण्याच्या भट्टीत स्फोट झाला होता. या दुर्घटनेत 34 कामगार भाजले आहे. रविवारी शिवसेना नेते तथा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या कंपनीस भेट दिली. कंपनीत झालेल्या स्फोटाच्या ठिकाणी पाहणी करून कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणार्‍या कंपनी मालकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

शनिवारी दुपारी कंपनीच्या एका भट्टीत झालेल्या स्फोटात 34 जण जखमी झाले आहेत. त्यातील 7 जणांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. त्यापैकी एक कामगाराचा रविवारी संभाजीनगरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. कंपनीतील कामगारांना वेठबिगारांपेक्षाही हलाखीचे जीवन जगावे लागत असल्याची माहिती पाहणी केल्यानंतर दानवे यांनी दिली. पाहणी दरम्यान कंपनी मालकाशी संवाद साधून कामगारांच्या सुरक्षतेची, सुरक्षा उपकरणाची व कंपनीत कामगारांना देण्यात येणार्‍या सुविधांची दानवे यांनी माहिती घेतली.

औद्योगिक सुरक्षतेची कसलेही नियम या कंपनीत पाळल्या नसल्याने हा स्फोट झाल्याचे दिसून आले आहे. कामगारांच्या सुरक्षेतेची संपूर्ण जबाबदारी कंपनी मालकाची असल्याने त्यांच्या दुर्लक्षामुळे अपघात झाला असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले. राज्यपातळीवर औद्योगिक सुरक्षा विभाग, उद्योग विभाग व कामगार विभागांना संबंधित घटनेत दोषी असणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी अशी सूचना मी करणार असल्याचे दानवे म्हणाले.तसेच कंपन्या डिश विभागातील अधिकार्‍यांना पाहणी करण्यासाठी कंपनीच्या आत मध्ये येऊ देत नसल्याची तक्रार माझ्याकडे आहे. त्यामुळे संपूर्ण कंपनीच्या टेक्निकल टीमच्या दुर्लक्षामुळे हा अपघात झाल्याची प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली. याप्रंसगी जालना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, ए. जे. बोराडे,माजी आमदार संतोष सांबरे,शहरप्रमुख बाळा परदेशी, देवनाथ जाधव व उद्योगपती घनश्याम गोयल उपस्थित होते.