अंबरनाथच्या आयुध निर्माण कारखान्यात ‘व्हेंटिलेटर’ निर्मितीचा प्रयोग यशस्वी, अवघ्या 25 हजारात तयार केले व्हेंटिलेटर

1689

हिंदुस्थानच्या संरक्षण मोहीमेत अद्यायावत शस्त्रांची निर्मिती करणाऱ्या आयुध निर्माणी कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी  व्हेंलिलेटर निर्मितीचा प्रयोग यशस्वी केला आहे. हे व्हेंलिलेटर ‘कोरोना’ विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत रुग्णांना  वरदान  ठरणार आहे. अवघ्या आठ दिवसात कंपनीच्या कामगारांनी रुग्णाला श्वाास घेण्यास सोपे जाणारी ही यंत्रणा विकसीत केली आहे.

1953 पासून अंबरनाथ येथील मशिन टुल प्रोटोटाईप फॅक्टरीमध्ये लष्कर आणि नौदलासाठी अत्याधुनिक शस्त्रांची निर्मिती होते. ‘कोरोना’ विषाणूच्या वाढत्या संसर्गाने सर्व जगाला वेठीस धरले आहे. हिंदुस्थानही त्याला अपवाद नाही. युद्धजन्य परिस्थितीत नेहमीच उत्तम कामगिरी करणाऱ्या आयुध निर्माणी समूहाने या साथीच्या आजारातही देशवासियांना मदत करण्याचा निर्णय घेतला. या कारखान्यता तयार झालेले हे छोटे व्हेंटिलेटर अशावेळी रुग्णाला पुरेसा श्वाास घेण्यास उपयोगी ठरू शकणार आहे.

या व्हेंलिलेटरमध्ये रुग्णाच्या गरजेनुसार दर मिनिटाला 12 ते 30 वेळा श्वाास घेता येऊ शकणारी व्यवस्था आहे. थेट वीज आणि बॅटरी अशा दोन्ही पद्धतीने हे व्हेंटिलेटर काम करते. तीन तासांचा बॅटरी बॅकअप असल्याने रुग्णवाहिकेत रुग्णाला त्याचा उपयोग होऊ शकतो. तसेच आयुध निर्माणी समूहातील वैद्याकीय अधिकाऱ्यांनी या व्हेंलिलेटर चाचणी करून त्याला प्रमाणित केले आहे, अशी माहिती मशिन टुल प्रोटोटाईप फॅक्टरीचे महाप्रबंधक राजीवकुमार यांनी दिली.

 महिन्याभरात 2 हजार व्हेंटिलेटर तयार करण्याची क्षमता
संचारबंदीच्या काळात कारखान्यातील कामगारांनी विशेष परवानगी घेऊन बनविलेल्या या व्हेंटिलेटरची किंमत अवघी 25 हजार रूपये आहे. शासनाने ऑर्डर दिल्यास युद्ध पातळीवर महिन्याभरात दोन हजार व्हेंटिलेटर तयार करण्याची क्षमता असल्याची माहिती कंपनी व्यवस्थापकांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या