अमेरिकेत मृत्यूचे तांडव, एकाच दिवशी 1480 रुग्णांचा मृत्यू आणि 30 हजार नवीन रुग्णांची भर

1359
प्रातिनिधीक फोटो

कोरोना व्हायरसचा जगभरात थैमान सुरू आहे. चीनबाहेर इटली, फ्रांस, स्पेन, इराण आणि अमेरिका या देशात अक्षरशः मृत्यूचे तांडव सुरू आहे. अमेरिकेत दिवसेंदिवस परिस्थिती खराब होत आहे. गेल्या 24 तासात अमेरिकेत 1400 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून 30 हजार नवीन रुग्णांची भर पडली आहे. यामुळे रुग्णांचा आकडा 3 लाखाजवळ सरकला आहे.

चीनच्या वुहान शहरामधून जगभरातील 180 देशात पसरलेला कोरोना व्हायरस अमेरिकेमध्ये मृत्यूचे थैमान घातल आहे. अमेरिकेमध्ये सर्वाधिक 3 लाख लोकांना कोरोना विषाणूची लागण झालीआहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरात 24 तासात सर्वात जास्त मृत्यू अमेरिकेत झाले आहे. ‘जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी’ ट्रॅकरच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेत 24 तासांत कोरोना विषाणूमुळे 1480 मृत्यूची नोंद झाली आहे.

अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 2.70 लाखाहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे मृत्यूची संख्या 7406 वर पोहोचली आहे. दुसरीकडे, अमेरिकेत सुमारे 12 हजार लोक उपचारानंतर बरे झाले आहेत.

दरम्यान, जगात सुमारे 11 लाख लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. याशिवाय कोरोना विषाणूमुळे 59 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हिंदुस्थानातही कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या 3 हजारांवर पोहोचलो असून मृतांचा एकदा सत्तरीच्या घरात गेला आहे. हिंदुस्थानात महाराष्ट्र, केरळ आणि दिल्लीत सर्वाधिक रुग्ण आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या