व्हायोलिन वाजवून व्हेंटिलेटरवरील रुग्णाने मानले डॉक्टरांचे आभार

कोरोनाच्या या संकटात डॉक्टर आपल्या जीवाची बाजी लावून रुग्णांचे प्राण वाचवत आहेत. कोरोनाची लागण झालेल्या अमेरिकेतील एका 70 वर्षीय संगीत शिक्षकाने व्हेंटिलेटरवर उपचार सुरू असतानादेखील व्हायोलिन वाजवून डॉक्टरांचे आभार मानले आहेत. अमेरिकेतील इंटरमाउंटन हेल्थकेअरने सोशल मीडियावर पोस्ट केलेला हा व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होत आहे. संगीत शिक्षक असलेला हे कोरोना रुग्ण एक महिन्यापासून व्हेंटिलेटरवर होते. त्यांना बोलतादेखील येत नव्हते. ही व्यक्ती संगीत शिक्षक असल्याचे नर्सला समजताच या नर्सने त्यांना व्हायोलिन आणून दिले. व्हायोलिन पाहताच ते खूप खूश झाले आणि त्यांनी व्हायोलिन वाजवून डॉक्टर, नर्सचे आभार मानण्याची इच्छा एका कागदावर लिहून व्यक्त केली. त्यानंतर अनोख्या शैलीत त्यांनी सर्वांचे आभार मानले.

आपली प्रतिक्रिया द्या