कश्मीरप्रश्नी मध्यस्थी करणार नाही, अमेरिकेच्या कोलांटउडीने पाकिस्तानला चपराक

कश्मीरप्रश्नी मध्यस्थी करणार नाही, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी स्पष्ट केले. जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर कश्मीरप्रश्नी मध्यस्थी करू, अशी भूमिका ट्रम्प यांनी घेतली होती. मात्र, आता अमेरिकेने कोलांटउडी मारली आहे. त्यामुळे पाकिस्तानला आणखी एक जबर झटका बसला आहे.

हिंदुस्थानचे अमेरिकेचे राजदूत हर्षवर्धन श्रींगला यांनी कश्मीरप्रश्नी अमेरिका मध्यस्थी करू इच्छित नाही, असे स्पष्ट केले. कश्मीरप्रश्नी अमेरिकेची जी भूमिका आधीही होती तीच आताही असल्याचे सांगितले. हिंदुस्थान आणि पाकिस्तानला मान्य असेल तर आपण मध्यस्थी करू अशी अमेरिकेची भूमिका होती. मात्र, मध्यस्थीची ऑफर हिंदुस्थानने स्वीकारलेली नाही. त्यामुळे आता मध्यस्थी करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केल्याचे श्रींगला म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या