अमेरिकेत हिंदुंस्थानविरोधी प्रचार करणारे तिघे ब्लॅकलिस्ट, राहुल शेवाळे यांच्या पत्राची दखल

5406

अमेरिकेत हिंदुस्थान आणि हिंदूंविरोधात प्रचार करणाऱया तिघा जणांना ब्लॅकलिस्ट करत अशा घटकांपासून हिंदुस्थानी कलाकारांनी दूर राहावे, असे आवाहन हिंदुस्थान सरकारने केले आहे. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी पंतप्रधान कार्यालयाला लिहिलेल्या पत्राची गंभीर दखल घेत केंद्रीय गृहखात्याने ही कारवाई केली आहे.

अमेरिकेच्या ह्युस्टन आणि टेक्सॉसमध्ये राहणाऱया हिंदुस्थानी नागरिकांनी काही व्यक्ती देशविरोधात प्रचार करत असल्याची माहिती शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांना मिळाली होती. त्या पार्श्वभूमीवर, शेवाळे यांनी अमेरिकेत देशविरोधात प्रचार करणाऱया इव्हेंट प्रमोटर रेहान सिद्धिकी, राकेश कौशल आणि दर्शन मेहता यांची माहिती पंतप्रधान कार्यालयाला कळवली. शेवाळे यांच्या पत्राची गंभीर दखल घेत केंद्रीय गृह खात्याने रेहान सिद्धिकी, राकेश कौशल आणि दर्शन मेहता यांना ह्युस्टन आणि टेक्सॉसमधून ब्लॅकलिस्ट करण्याची कारवाई केली.

आपली प्रतिक्रिया द्या