विवस्त्रावस्थेत फिरत होती प्रसिद्ध अभिनेत्री…मनोरुग्णालयात केली रवानगी

हॉलीवूड अभिनेत्री अमांडा बायनेस गेल्या काही वर्षांपासून वाईट टप्प्यातून जात आहे. अलीकडेच अमांडा लॉस एंजेलिसच्या रस्त्यावर विवस्त्रावस्थेत फिरताना दिसली.  त्यानंतर तिला मानसिक उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. अमांडाची मागच्या काही वर्षांपासून तिचे मानसिक अवस्था बिघडली आहे.

कॅलिफोर्निया येथे राहणाऱ्या अमांडाला बायपोलर हा आजार असून तिला मानसिक उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, अलीकडेच अमांडा लॉस एंजेलिसच्या रस्त्यावर विवस्त्रावस्थेत फिरताना दिसली होती. तिने रस्त्याच्या मध्ये एका कार थांबविली आणि ड्रायव्हरला आपल्याबाबत सांगायला लागली. त्यानंतर अभिनेत्रीच्या जसे लक्षात आले की ती रस्त्यावर विवस्त्रावस्थेत उभी असल्याचे लक्षात येताच तिने 911 महिला हेल्पलाइनवर कॉल केला. अमांडाला तत्काळ पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तिला लगेच तीन दिवसांसाठी मनोरुग्ण कोठडीत पाठवण्यात आले. अहवालानुसार, अमांडाने तिची औषधे घेणं बंद केले होते. टीएमझेड टॅब्लॉइडच्या अहवालानुसार, अमांडा अजूनही रुग्णालयात असून तिच्यावर उपचार केले जात आहेत. यामध्ये सुदैवाने अमांडाला काहीही झालेले नाही. पण जिथे ती सापडली त्याबाजुला काहीही होऊ शकले असते.

मिळालेल्या माहितीनुसार, अमांडाचे बराच काळ आपल्या कुटुंबियांशी संपर्कात नाही. तिचा माजी प्रियकर पॉल मायकलने सांगितले की, अमांडा आणि पॉल शेवटचे डिसेंबर 2022 मध्ये एकत्र दिसले होते. पॉलसोबत झालेल्या ब्रेकअपनंतरच अमांडाची मानसिक स्थिती बिघडली होती. तिच्या आईच्या म्हणण्यानुसार, अमांडा 2013 पासून बायपोलर आजाराने ग्रस्त आहे. अमांडा 36 वर्षांची आहे. 2013 मध्ये जेव्हा तिला या आजाराचे निदान झाले तेव्हा तिच्या आईने तिची जबाबदारी घेतली होती.

एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत अमांडाने सांगितले की, तिला ड्रग्जचे व्यसन लागले होते. त्यामुळे तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. मला वाटायचं की हे जग माझ्या कामाचं नाहीय. सर्व काही निरर्थक वाटत आहे. यावर मात करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मला खूप काम करायचे आहे. अमांडा बाल अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. निक्लोडियन कॉमेडी स्केच सिरीज ऑल दॅटमधून त्याला प्रसिद्धी मिळाली. यानंतर ती अमांडा शोमध्येही दिसली होती. अमांडाला दोन यंग आर्टिस्ट म्हणून पुरस्कारही मिळाले आहेत. तिने अनेक सिनेमांमध्येही काम केले आहे.