देदीप्यमान राम मंदिर होणार, अमित शहांचा निर्धार

592
amit-shah

अयोध्येत राम मंदिर झाले पाहिजे अशी प्रत्येकाचीइ च्छा आहे परंतु काँग्रेस पक्षाचे नेते न्यायालयात केस चालू देत नव्हते अशी टीका अमित शहा यांनी केली. तसेच आता अयोध्येत भव्य दिव्य, देदीप्यमान असे मंदिर उभे राहील असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. झारखंडमध्ये एका सभेत ते बोलत होते.

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. भाजपध्यक्ष अमित शहा झारखंडमध्ये प्रचारासाठी दाखल झाले आहेत. प्रचारात त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

शहा म्हणाले की “आदिवासींच्या शिक्षणासाठी भाजपने मोठी पावले उचलली आहेत. गेल्या पाच वर्षात ४३८ एकलव्य शाळा बनवल्या गेल्या.” गेल्या पाच वर्षात झारखंडमध्ये नक्षलवाद संपण्यात राज्य सरकारला यश आल्याचा दावा शहा यांनी केला आहे.

झारखंड विधानसभा निवडणुकीत अमित शहा यांनी राम मंदिराचा मुद्दाही पुढे केला. जेव्हा अयोध्या प्रकरणावर न्यायालयात खटला सुरू होता तेव्हा काँग्रेस नेते खटला चालू देत नव्हते. राम मंदिराचा तोडगा संविधानिक मार्गाने निघावा यासाठी आमचे प्रयत्न होते. आता कोर्टाचा निकाल लागला आहे.” अयोध्येत प्रभू रामाचे भव्य दिव्य मंदिर उभे राहिल असेही शहा म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या