Lok Sabha 2019 अमित शाह निवडणूक लढवणार नाहीत?

amit-shah

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे समोर आले आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत अमित शाह निवडणूक लढवणार नसल्याचा निर्णय झाल्याचे समजते.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज भाजप मुख्यालयात पार पडली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, अर्थमंत्री अरूण जेटली, रस्ते व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी, गृहमंत्री राजनाथ सिंह व इतर भाजपचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. मात्र या बैठकीनंतर एकही यादी अद्याप भाजपने जाहीर केलेली नसून उद्या पुन्हा भाजपची बैठक होणार असल्याचे समजते.