देशात लवकरच पोलीस आणि न्यायवैद्यक विद्यापीठाची स्थापना

439
amit-shah

लवकरच केंद्र सरकार ऑल इंडिया पोलीस युनिव्हर्सिटी आणि ऑल इंडिया फॉरेन्सिक सायन्स युन्हिर्सिटीची स्थापना करेल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. या दोन्ही विद्यापीठांशी संबंधित कॉलेज प्रत्येक राज्यांत असतील. देशातील पोलीस महासंचालकांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेला  अमित शहा यांनी संबोधित केले. यावेळी आयपीसी आणि सीआरपीसीच्या काही कलमांमध्ये बदल करण्याचे संकेत त्यांनी दिले.

पुणे येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च संस्थेत डीजीपी/ आयजी परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्या परिषदेचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते झाले. देशातील मोठे पोलीस अधिकारी एकत्र येऊन देशाच्या सुरक्षेसाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात मदत करीत असल्याचे शहा यांनी सांगितले.

गृहमंत्री शहा यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अंदमान-निकोबारचे एबरदीन स्टेशन हाऊस, गुजरातचे बालासिनोर आणि मध्य प्रदेशचे एजेके बुरहानपूर यांना सन्मानित करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या