बच्चन कुटुंबीयांच्या संपर्कातील 26 जण कोरोना निगेटिव्ह

बिग बी अमिताभ, अभिषेक, ऐश्वर्या राय आणि मुलगी आराध्या यांना कोरोना झालेल्या पार्श्वभूमीवर, त्यांच्या संपर्कातील 54 जणांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. त्यातील 26 जणांची चाचणी करण्यात आली असून सर्व जण निगेटिव्ह आले आहेत. तर 28 जणांना होम कोरेंटाईन करण्यात आले आहे.

कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना विलेपाल्र्यातील नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर ऐश्वर्या आणि तिची मुलगी आराध्या यांना होम कोरेंटाईन करण्यात आले आहे. मात्र, जया बच्चन तसेच इतर कुटुंबीयांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. पालिकेने बच्चन कुटुंबीयांचे चारही बंगले सील केले असून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या