अमिताभ बच्चन आणि नागराज मंजूळे यांना कॉपीराईट उल्लंघन प्रकरणी नोटीस

1737

अभिनेते अमिताभ बच्चन आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना कॉपीराईट उल्लंघन प्रकरणी एका दिग्दर्शकाने कायदेशीर नोटीस बजावली आहे. आगामी चित्रपट झुंडसाठी या दिग्दर्शकाने चित्रपटाच्या निर्मात्यांनी ही नोटीस बजावली आहे. झुंड हा चित्रपट विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. विजय बरसे हे फुटबॉल प्रशिक्षक आहेत.

jhund-first-look

नंदी चिन्नी कुमार असे या दिग्दर्शकाचे नाव असून हैद्राबामधून ते आपली चित्रपट निर्मिती करतात. त्यांनी झुंडच्या चित्रपट निर्मात्यांवर कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. नंदी यांनी चित्रपटातील प्रमुख भुमिकेत असलेले अमिताभ बच्चन, दिग्दर्शक नागराज मंजुळे, निर्माते कृष्णन कुमार आणि टी सीरीजच्या भुषण कुमार यांना नोटीस बजावली आहे. टी सीरीज कडून चिन्नी यांना उत्तर मिळाले आहे परंतु या उत्तरावरून ते समाधानी नाहीत.

2017 साली नंदी यांनी अखिलेश पॉल यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे हक्क विकत घेतले होते. अखिलेश पॉल 2010 साली ब्राझील मध्ये झालेल्या होमलेस फुटबॉल वर्ल्ड कपच्या हिंदुस्थानी टीमचे कप्तान होते. नंदी यांनी अखिलेश पॉल यांचे प्रशिक्षक विजय बरसे यांनाही कायदेशीर नोटीस बजावली आहे.

नागराज मंजुळे यांचा चित्रपट विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे तर चिन्नी यांचा चित्रपटाची कथा बरसे यांचा विद्यार्थी अखिलेश पॉल वर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या