कीबोर्डऐवजी हस्ताक्षराचा ट्रेंड आणा, बिग बी यांचे चाहत्यांना आवाहन

476

महानायक अमिताभ बच्चन सोशल मिडीयावरून चाहत्यांशी नेहमी कनेक्ट असतात. नुकतेच त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात चाहत्यांसाठी पत्र लिहीले असून ते इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे. यात कीबोर्ड रायटिंगऐवजी हातांनी लिहिण्याची सवय लावा, असे आवाहन त्यांनी चाहत्यांना केले आहे.

बिग बी म्हणाले, ‘कीबोर्ड रायटिंगऐवजी हातांनी लिहिलेले नेहमीच चांगले असते. त्यामुळे आपल्याला नवे काहीतरी शिकण्यास प्रोत्साहन मिळते. पुन्हा एकदा हातांनी लिहिण्याचा ट्रेंड आणा. हा ट्रेंड आपल्या मेंदूसाठी देखील उपयुक्त आहे.’ दरम्यान त्यांचे हस्ताक्षर पाहून अभिनेता कार्तिक आर्यनने त्यांना गंमतीदार रिप्लाय केला आहे. ‘मी डॉक्टर कुटुंबातील मुलगा आहे सर. माझे हस्ताक्षर पाहून चकीत व्हाल,’ असे कार्तिकने म्हटले आहे. तर ‘मी देखील हातांनीच लिहीणे पसंत करते. त्यामुळे मला नवे काहीतरी शिकता येते’ अशी कमेंट अभिनेत्री प्रिती झिंटाने केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या