
बॉलीवूडचे महानायक ‘बिग-बी’ अमिताभ बच्चन यांनी कोरोनाला हरवले आहे. त्यांची कोरोना चाचणी रविवारी निगेटिव्ह आल्याने नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, आपल्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणार्या लाखो चाहते आणि नानावटी रुग्णालयाचे डॉक्टर्स-नर्सेस यांचे अमिताभ यांनी ट्विटरवर ‘धन्यवाद’ मानून आभार व्यक्त केले आहेत. 20 दिवसांच्या उपचारानंतर बिग बी कोरोनाकर यशस्वीरीत्या मात करून घरी सुखरूप परतले.
T 3613 – I have tested CoVid- have been discharged. I am back home in solitary quarantine.
Grace of the Almighty, blessings of Ma Babuji, prayers & duas of near & dear & friends fans EF .. and the excellent care and nursing at Nanavati made it possible for me to see this day . pic.twitter.com/76jWbN5hvM— Amitabh Bachchan (@SrBachchan) August 2, 2020
अभिषेक नानावटीत
अमिताभ कोरोनामुक्त झाले असले तरी अभिनेता अभिषेक याच्यावर मात्र नानावटी रुग्णालयात उपचार सुरूच आहेत. खुद्द अभिषेक यानेच ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.
I, Unfortunately due to some comorbidities remain Covid-19 positive and remain in hospital. Again, thank you all for your continued wishes and prayers for my family. Very humbled and indebted.
I’ll beat this and come back healthier! Promise.— Abhishek Bachchan (@juniorbachchan) August 2, 2020



























































