
अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत 2.67 एकर जमीन खरेदी केली आहे. ही जमीन मुंबईतील डेव्हलपर ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ यांच्याकडून खरेदी केली असून या जमिनीसाठी त्यांनी 35 कोटी रुपये मोजले आहेत. ही जमीन 75 एकरमध्ये विकसित होत असलेल्या ‘द सरयू’ या लक्झरी प्रकल्पाजवळ आहे. तसेच राम मंदिरापासून फक्त 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. अमिताभ यांनी याआधी जानेवारी 2024 मध्ये 86 लाखांची 5,069 चौरस मीटर प्लॉट खरेदी केला होता. त्यानंतर सरयूमध्ये 10 हजार चौरस फुटांचा प्लॉट 14.5 कोटींना खरेदी केला होता. मे 2025 मध्ये सरयूजवळ 25 हजार चौरस फुटांचा प्लॉट 40 कोटींना खरेदी केला होता.




















































